Saturday, April 10, 2010

Current Affairs 2009 -10

 
१) पुरस्कार, मान-सन्मानविषयक घडामोडी :
*
२०१०च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली म्यंगबाक होते.
* २००९चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार- बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांना प्रदान.
* दिवंगत गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना नुकताच पाकिस्तान सरकारने 'सितारा-ह-इम्तियाझ' पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला.
* ४६व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा कै. दादासाहेब फाळके पुरस्कार 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटाला मिळाला. (दिग्दर्शक-परेश मोकाशी)
* २००९चा बुकर पुरस्कार-कॅनडाच्या लेखिका अ‍ॅलिस मुन्रो यांना मिळाला.
* महाराष्ट्र शासनाच्या संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारासाठी नुकतीच जगन्नाथ महाराज पवार-नाशिककर यांची निवड (यापूर्वी रा. चि. ढेरे व ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर यांना गौरविण्यात आले.)
* २००९ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार-सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांना मिळाला.
* २००८चा भारतरत्न पुरस्कार-पं. भीमसेन जोशी. या अगोदर २००१ मध्ये लतादीदी मंगेशकर व बिस्मिल्ला खाँ यांना मिळाला. हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून सुरुवात सन १९५४ सालापासून झाली.
* पहिला भारतरत्न पुरस्कार-सी. राजगोपालाचारी, एस. राधाकृष्णन व सी. व्ही. रामन यांना मिळाला.
* २००९चे शांततेचे नोबेल पारितोषिक-बराक ओबामा.
* २००९चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक-व्यंकटरामन रामकृष्णन
* भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते-रवींद्रनाथ टागोर (१९१३-साहित्य)
* २००९चा साहित्य अकादमीचा पुरस्कार-हिंदी कवी कैलास वाजपेयी यांच्या 'हवा में हस्ताक्षर'ला देऊन गौरविण्यात आले.
* २००९ची मिस वर्ल्ड-कायनी अल्दोरिनो (जिब्राल्टर)
* २००८चा दादासाहेब फाळके पुरस्कार-सिनेमॅटोग्राफर बी. के. मूर्ती यांना देऊन गौरविण्यात आले.
* २००९ चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार-अभिनेत्री सुलोचना.
* २००९ चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार- प्रणव मुखर्जी
* २००९चा जनस्थान पुरस्कार (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)- ना. धों. महानोर
* २००९चा महात्मा गांधी शांतता पुरस्कार- म्यानमारच्या ऑग सान स्यू की यांना मिळाला.
* सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाकडून 'डी. लिट' पदवी देऊन गौरविण्यात आले.
* परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एसीएम फेलो पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली.
२) निवड, नेमणूकाविषयक घडामोडी :
* १५व्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार व मंत्री : अगाथा संगमा
* नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी शिवशंकर मेनन यांची नेमणूक
* भारताचे नवे २६वे लष्करप्रमुख म्हणून व्ही. के. सिंग ३१ मे २०१० पासून सूत्रे हाती घेतील.
नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या :
पश्चिम बंगाल    - एम. के. नारायणन
राजस्थान    - प्रभा राव
केरळ    - रा. सू. गवई
पंजाब    - शिवराज पाटील
छत्तीसगड    - शेखर दत्त
महाराष्ट्र    - के. शंकरनारायणन
* भारतीय हवाई दलाचे प्रमुख-प्रदीप वसंत नाईक (२२वे) एअरचीफ मार्शल
* जागतिक आरोग्य संघटनेचे उपसंचालक-डॉ. रघुनाथ माशेलकर
* भारताचे मालदीव येथील राजदूत-ज्ञानेश्वर मुळे
* भारताचे नौदल प्रमुख-अ‍ॅडमिरल निर्मलकुमार वर्मा (१७वे)
* राष्ट्रीय भटक्या-विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष-बाळकृष्ण रेणके
* विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष-डॉ. सुखदेव थोरात
* इस्रोचे नवीन अध्यक्ष-डॉ. के. राधाकृष्णन
* राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष-डॉ. वसंत गोवारीकर
* युनोचे महासंचालक-वान की मून (दक्षिण कोरिया)
* अमेरिकेतील भारताच्या नव्या राजदूत-मीरा शंकर
* महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त-नीला सत्यनारायण
* अफगाणिस्तानचे अध्यक्ष-हमीद करझई
* चीनचे अध्यक्ष-हू जिंताओ, पंतप्रधान-वेन जियाबाओ
* नेपाळचे अध्यक्ष-डॉ. रामबरन यादव, पंतप्रधान-माधवकुमार नेपाळ
* रशियाचे अध्यक्ष-दिमित्री मेदवेदेव, पंतप्रधान-ब्लादिमीर पुतीन
* आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे महासंचालक-युकिया अमानो (जपान)
* नामचे महासचिव-होस्नी मुबारक
* राष्ट्रकूलचे महासचिव-कमलेश शर्मा
* जागतिक बँकेचे अध्यक्ष-रॉबर्ट झोएलिक
* सार्कचे अध्यक्ष-महिंद्रा राजपक्षे (श्रीलंका)
३) बहुचर्चित पुस्तके :
* रिटर्न टू अल्मोडा-आर. के. पचौरी
* द ग्रेट इंडियन नॉवेल-शशी थरूर
* द व्हाईट टायगर-अरविंद अडिगा
* द ओल्ड प्ले हाऊस-कमलादास सुरैय्या
* ड्रीम्स ऑफ माय फादर (आत्मचरित्र)-बराक ओबामा
* मधुशाला-हरिवंशराय बच्चन
* गॉन विथ द विंड-मार्गारेट मिचेल
* सुपरस्टार इंडिया-शोभा डे
* द कोर्स ऑफ माय लाईफ-सी. डी. देशमुख
* संतसूर्य तुकाराम-डॉ. आनंद यादव
* ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक-बी. जी. देशमुख
* स्पीकर्स डायरी-मनोहर जोशी
* माय प्रेसिडेन्शियल इयर्स-डॉ. व्यंकटरामण
* डेबू-विठ्ठल वाघ
* द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, फाईव्ह पॉईंट समवन-चेतन भगत
* यूअर्स सिंसयर्ली टुडे-नटवर सिंह
* तहान, बारोमास-सदानंद देशमुख
४) विविध महत्त्वाच्या समित्या व आयोग :
* राम प्रधान समिती - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती
* किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती
* अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली.
* डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती
* माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता
* डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता
* न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी
* रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे
* शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी
* इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी
* अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता
* कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता
* डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता
* आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता
* न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता
* न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग - सहाव्या केंद्रीत वेतन आयोगाकरिता
* यशपाल समिती - देशातील उच्च शिक्षण धोरणात आमूलाग्र सुधारणा सुचविणे
* मुखोपाध्याय समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले
५) विविध ऑपरेशन्स
* ऑपरेशन क्लीअर - आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम
* ऑपरेशन चमर्स - काश्मीरमध्ये लपलेल्या अतिरेक्यांविरुद्ध भारतीय सेनेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन रेडडॉन - सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन पुशबॅक - भारतातील बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात राबविलेली मोहीम
* ऑपरेशन ब्लॅकबोर्ड - प्राथमिक शिक्षण स्तरावर किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम
* ऑपरेशन मेघदूत - भारतीय सेनेने सियाचीन खोऱ्यात राबविलेली मोहीम
* ऑपरेशन ब्लू स्टार - भारतीय सेनेने सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेकीविरोधी मोहीम
* ऑपरेशन विजय - कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राबवलेली मोहीम (२६ मे ते २६ जुलै १९९९)
* ऑपरेशन सनशाईन - कोलकात्यातील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे व विक्रेत्यांविरुद्ध राबवलेली मोहीम
* ऑपरेशन साहाय्यता - महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये भूकंपग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी
* ऑपरेशन कालभैरव - मादक द्रव्याचा व्यापार बंद करण्यास भारताने राबवलेली मोहीम
६) विविध आंतरराष्ट्रीय करार व संमेलने :
* डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केली होती.
* नोव्हेंबर २००९ मध्ये भारत व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला.
* २७ ऑक्टो. २००९ रोजी भारत व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला.
* अर्जेटिना हा सातवा देश आहे की भारताने आंतरिक्ष सहकार्य करार केला.
* भारत सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत 'डॉल्फिन' या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले.
* ४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते.
* पुणे येथे होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड
* ऑक्टोबर २०१० मध्ये जगातील पहिल्या व्याघ्र शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार असून ही परिषद राजस्थानातील रणथंबोर येथे पार पडणार आहे.
* पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, 'विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.'

No comments:

Post a Comment