Wednesday, April 28, 2010
Agriculture Events
० भारतातील 'सव्र्हे ऑफ इंडिया' ही संस्था जमिनीची मोजणी करून आकडेवारी प्रसिद्ध करीत असते. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण ९२.७ टक्के जमिनीचे मापन करणे शक्य झाले आहे.
० भारतातील एकूण जमिनीचे आकारमान ३२.८७ कोटी हेक्टर आहे. यापैकी ३०.४४ कोटी हेक्टर जमिनीचे मापन करण्यात आले आहे.
० भारतातील उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ४७ टक्के जमीन लागवडीखाली आहे. प्रत्यक्ष लागवडीखालील असलेल्या जमिनीपैकी २० टक्के जमिनीवर दुबार पिके घेतली जातात.
० लागवडीखालील निव्वळ क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. तर दुबार पिके घेण्याबाबत महाराष्ट्राचा भारतात १८ वा क्रमांक लागतो.
० महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१ टक्के क्षेत्र वनक्षेत्र आहे. राज्यातील वनक्षेत्रापैकी ५६ टक्के क्षेत्र विदर्भात, पाच टक्के मराठवाडय़ात व ३९ टक्के क्षेत्र उर्वरित महाराष्ट्रात आहे.
० भारतीय संविधानाच्या कलम ५१ (९) (जी) प्रमाणे वने, नद्या, जलाशय व वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.
० २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील ५२ टक्के जनता स्वयंपाकासाठी जळावू लाकडावर अवलंबून आहे.
० भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ५४ टक्के हे पिकाखाली क्षेत्र, आठ टक्के क्षेत्र दोन ते तीन वर्षांनी लागवडीखाली, १३ टक्के जमीन पडीक तर २२ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त आहे. एकूण लागवडीच्या ७६ टक्के क्षेत्र निव्वळ अन्नधान्य उत्पादनासाठी वापरले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पदनाच्या २६.५ टक्के उत्पादन कृषी साधनापासून मिळते म्हणून भारत कृषीप्रधान देश आहे.
० भारत देश हा १९७४ साली अन्नधान्य उत्पादनात स्पयंपूर्ण झाला तर १९७७ मध्ये प्रथम अन्नधान्य निर्यात केले.
० तांदूळ हे देशातील महत्त्वाचे पीक मानले जाते. तांदूळ उत्पादक देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एकूण उत्पादनापैकी २१.६ टक्के उत्पादन भारतात होते. भारतात तांदळाचे पंजाब, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू ही तीनच राज्ये उच्च उत्पादकता असलेली राज्ये ओळखली जातात.
० तांदळाच्या नवीन सुधारित प्रचलित जाती- अभिषेक, भूतनाथ, चंद्रमा, इंदिरा सोना, सम्राट.
० चुरमुरे, पोहे तयार करण्यासाठी तांदळाची जात- राधानगरी १८५-२
० 'सुवर्णा सबमर्जन्स-१' ही तांदळाची नवी जात पूरप्रतिबंधक असून मोठय़ा पुरातही टिकून राहणारी आहे. (फिलिपाईन्समधील मनिला येथील संशोधकांनी शोधून काढली.)
० महाराष्ट्र देशात साखर उद्योगात आघाडीवर असून देशाच्या एकूण उत्पादनापैकी ३६ ते ४० टक्के साखर उत्पादन होते. महाराष्ट्रात एकूण १९३ साखर कारखाने आहेत.
२) फलोत्पादन : नारळ हे उष्ण कटिबंधीय पीक आहे. नारळाच्या जागतिक उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक इंडोनेशिया, दुसरा क्रमांक फिलिपाइन्स व तिसरा- भारत.
० महाराष्ट्रात ३२,००० हेक्टर (२००९) क्षेत्र नारळाखाली आहे.
० भारताची सरासरी प्रतिहेक्टर नारळ उत्पादन क्षमता ६६३२ आहे.
० नारळाच्या जाती- ऑरेंज डॉर्फ, ग्रीन डॉर्फ, यलो डॉर्फ, बाणवली (उंच जात)
० २ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो.
० चिंच- महत्त्वाची जात- प्रतिष्ठान (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
० आंब्याच्या महत्त्वाच्या जाती- हापूस, रत्ना, मल्लीका, आम्रपाली, सिंधू इ.
० केळीच्या जाती- बसराई, हरिसाल, सालवेलची, सफेद वेलची, राजेडी इ.
० मोसंबीच्या प्रचलित जाती- न्यूसेलर, मालगुडी, जाफा, वॉशिंग्टन नॉवेल, सातगुडी इ.
० डाळिंबाच्या जाती- गणेश (डीबीजी-१), मस्कत, डोलका, काबूल, आळंदी इ.
० चिक्कूच्या महत्त्वाच्या जाती- क्रिकेट बॉल, कोईमतूर-१, पिल्ली पत्ती, बंगलोर इ.
० द्राक्ष- माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन सिडलेस, शरद सिडलेस, किसमिस बेरी इ.
० नाशिक जिल्ह्य़ात पिंपळगाव बसवंत व पुणे जिल्ह्य़ात नारायणगाव येथे श्ॉम्पेन तयार करतात.
० पेरू- सरदार, धारवाड, बनारसी, कोथरूड, लखनऊ २९, नाशिक इ.
० अंजिर- पूना अंजीर, काबूल, लखनौ, मार्सिलीस, ब्राऊन
तुर्की इ.
० महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविण्यात अहमदनगर जिल्ह्य़ाचा प्रथम क्रमांक लागतो.
० अननसाचे उगमस्थान- ब्राझील
० काजूचे उगमस्थान- ब्राझील.
० मिरचीची विदर्भातील प्रसिद्ध जात- पांढुर्णा.
० संपूर्ण भारतात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश (६० टक्के) मध्ये होते.
० चिक्कू झाडाचे मूळस्थान- मेक्सिको
० आंब्याचे मूळस्थान- वायव्य आशिया
० डाळिंबाचे मूळस्थान- इराण
० अंजीराचे मूळस्थान- दक्षिण अरेबिया
० काजूचे मूळस्थान- ब्राझील
० फळांचे अभ्यास करणारे शास्त्र- पोमोलॉजी
Sunday, April 18, 2010
लातूर - हजरत सुरतशाह वलीचा दर्गा नांदेड - शिख धर्मगुरू गोविंदसिंगाची समाधी कल्याण - हाजीमलंग बाबाची कबर शिर्डी - श्रीसाईबाबांची समाधी पंढरपूर - श्रीविठ्ठलाचे मंदिर सेंट मेरी चर्च - बांद्रा (मुंबई उपनगर) शेगाव - संत गजानन महाराजांची समाधी (विदर्भाचे पंढरपूर) जि. बुलढाणा अमरावती - संत गाडगेबाबांची समाधी सज्जनगड (सातारा) - समर्थ रामदास स्वामींची समाधी मांढरदेवी (सातारा) - काळेश्वरी मातेचे मंदिर गणपतीपुळे (रत्नागिरी) - गणेश मंदिर. श्रीक्षेत्र औदुंबर (सांगली) - दत्तात्रेयाचे जागृत स्थान कारंजा (वाशिम) - नरसिंह सरस्वती मंदिर. पैठण (औरंगाबाद) - संत एकनाथांची समाधी (दक्षिणेची काशी म्हणतात) आपेगाव (औरंगाबाद) - संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान रामटेक (नागपूर) - महाकवी कालीदास यांचे स्मारक मोझरी (अमरावती) - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी गंगाखेड (परभणी) - संत जनाबाईंची समाधी तुळजापूर (उस्मानाबाद) - महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर आंबेजोगाई (बीड) - कवी मुकुंदराज व दासोपंतांची समाधी श्रीक्षेत्र माहुर (नांदेड) - रेणुकादेवीचे मंदिर जांब (जालना) - श्रीसमर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र नृसिंहवाडी/ नरसोबाची वाडी- दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद, श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती यांचे गाव, प्रसिद्ध दत्तमंदिर बाहुबली (कोल्हापूर) - जैन धर्मीयांचे तीर्थस्नान
सोलापूर - सिद्धेश्वर मंदीर जेजुरी - श्रीखंडोबाचे देवस्थान जुन्नर (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, शिवनेरी किल्ला आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वरांची समाधी श्रीक्षेत्र अक्कलकोट (सोलापूर) - श्रीस्वामी समर्थ मंदिर व मठ नेवासे (अहमदनगर) - संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथे लिहिली. चाफळ (सातारा) - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट देहू (पुणे) - संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव व कर्मभूमी त्र्यंबकेश्वर - संत निवृत्तीनाथांची समाधी श्रीक्षेत्र नाशिक - प्रसिद्ध काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेले तपोवन, पंचवटी, रामकुंड, सीताकुंड, कपालेश्वर मंदिर, एकमुखी दत्ताचे मंदिर, मुक्तिधाम मंदिर, भक्तिधाम मंदिर, सीता गुंफा, रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कापले तेव्हापासून या स्थानाला 'निशिक' असे नाव पडले.
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे
त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद भीमाशंकर- जिल्हा पुणे परळी वैजनाथ- जिल्हा बीड औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.
महाराष्ट्रातील अष्टविनायक
गणपतीचे नाव स्थळ जिल्हा
श्री मोरेश्वर मोरगाव पुणे
श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे
श्री महागणपती रांजणगाव पुणे
श्री विघ्नहर ओझर पुणे
श्री चिंतामणी थेऊर पुणे
श्री वरदविनायक महड रायगड
श्री सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर
महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे व तीर्थक्षेत्रे
शहरे/तीर्थक्षेत्रे नदी
पंढरपूर भीमा
नेवासे, संगमनेर प्रवरा
नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड गोदावरी
मुळा-मुठा पुणे
भुसावळ तापी
हिंगोली कयाधू
धुळे पांझरा
देहू, आळंदी इंद्रायणी
पंचगंगा कोल्हापूर
वाई, मिरज, कऱ्हाड कृष्णा
जेजुरी, सासवड कऱ्हा
चिपळूण वशिष्ठी
श्री क्षेत्र ऋणमोचन पूर्णा
महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने
कृष्णा-कोयना - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा
कृष्णा-पंचगंगा - नरसोबाची वाडी (कोल्हापूर)
मुळा-मुठा - पुणे
वैनगंगा-वर्धा - चंद्रपूर
वर्धा-वैनगंगा - शिवनी
कृष्णा-वारणा - हरिपूर (सांगली)
तापी-पूर्णा - चांगदेव (जळगाव)
महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते
प्रमुख घाट रस्ते/महामार्ग
कसारा / थळ घाट मुंबई ते नाशिक
माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर
दिवे घाट पुणे ते बारामती
कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण
फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी
बोर / खंडाळा घाट मुंबई ते पुणे
खंबाटकी घाट पुणे ते सातारा
पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर
आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी
चंदनपुरी घाट नाशिक ते पुणे
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
थंड हवेची ठिकाणे जिल्हा
चिखलदरा अमरावती
म्हैसमाळ औरंगाबाद
पन्हाळा कोल्हापूर
रामटेक नागपूर
माथेरान रायगड
महाबळेश्वर, पाचगणी सातारा
तोरणमळ धुळे
लोणावळा, खंडाळा पुणे
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्याने ठिकाण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे
पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया
ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर
गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट) अमरावती
चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा,
कोल्हापूर, रत्नागिरी
महाराष्ट्रातील अभयारण्ये
अभयारण्य जिल्हा
कर्नाळा (पक्षी) रायगड
माळठोक (पक्षी) अहमदनगर
मेळघाट (वाघ) अमरावती
भीमाशंकर (शेकरू खार) पुणे
सागरेश्वर (हरिण) सांगली
चपराळा गडचिरोली
नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक
देऊळगाव रेहकुरी (काळवीट) अहमदनगर
राधानगरी (गवे) कोल्हापूर
टिपेश्वर (मोर) यवतमाळ
काटेपूर्णा अकोला
अनेर धुळे
General Knowledge Maharashtra
महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले
जिल्हा किल्ले
ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड
रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे,
घोसाडे
रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड,
जयगड
सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड,
यशवंतगड
पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड,
वज्रगड इ.
नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई-
टंकाई, चांदवड
औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)
कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड
अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड
अकोला - नर्नाळा
सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,
वर्धनगड
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे
लेण्या ठिकाण/जिल्हा
अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद
एलिफंटा, घारापुरी - रायगड
कार्ला, भाजे, मळवली - पुणे
पांडवलेणी - नाशिक
बेडसा, कामशेत - पुणे
पितळखोरा - औरंगाबाद
खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद
महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :
जलाशय/नदी स्थळ/जिल्हा
भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
गंगापूर - (गोदावरी) नाशिक
राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
उजनी - (भीमा) सोलापूर
तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
यशवंत धरण - (बोर) वर्धा
मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
खडकवासला - (मुठा) पुणे
येलदरी - (पूर्णा) परभणी
बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :
खनिज जिल्हे
दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी
(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)
मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
तांबे - चंद्रपूर, नागपूर
चुनखडी - यवतमाळ
डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
कायनाईट - देहुगाव (भंडारा)
शिसे व जस्त - नागपूर
देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :
औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा
पारस - अकोला
एकलहरे - नाशिक
कोराडी, खापरखेडा - नागपूर
चोला (कल्याण) - ठाणे
बल्लारपूर - चंद्रपूर
परळीवैजनाथ - बीड
फेकरी (भुसावळ) - जळगाव
तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड
कोयना (जलविद्युत) - सातारा
धोपावे - रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी
महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग :
लघुउद्योग ठिकाण
हिमरुशाली - औरंगाबाद
पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक)
चादरी - सोलापूर
लाकडाची खेळणी - सावंतवाडी
सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर
हातमाग साडय़ा व लुगडी - उचलकरंजी
विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर,
सोलापूर
काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी
रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर),
एकोडी (भंडारा)
महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई
इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई
कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई
नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे
वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद
भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक
अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई
खार जमीन संशोधन केंद्र - पनवेल
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण :
विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
विद्यापीठ (१९२५)
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती
विद्यापीठ (१९८३)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड)
विद्यापीठ (१९८९)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर)
विद्यापीठ (१९९८)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे:
कवी/साहित्यिक टोपण नावे
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
Saturday, April 10, 2010
Current Affairs 2009 -10
* २०१०च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली म्यंगबाक होते.
* २००९चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार- बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांना प्रदान.
* दिवंगत गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना नुकताच पाकिस्तान सरकारने 'सितारा-ह-इम्तियाझ' पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला.
* ४६व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा कै. दादासाहेब फाळके पुरस्कार 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटाला मिळाला. (दिग्दर्शक-परेश मोकाशी)
* २००९चा बुकर पुरस्कार-कॅनडाच्या लेखिका अॅलिस मुन्रो यांना मिळाला.
* महाराष्ट्र शासनाच्या संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारासाठी नुकतीच जगन्नाथ महाराज पवार-नाशिककर यांची निवड (यापूर्वी रा. चि. ढेरे व ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर यांना गौरविण्यात आले.)
* २००९ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार-सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांना मिळाला.
* २००८चा भारतरत्न पुरस्कार-पं. भीमसेन जोशी. या अगोदर २००१ मध्ये लतादीदी मंगेशकर व बिस्मिल्ला खाँ यांना मिळाला. हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून सुरुवात सन १९५४ सालापासून झाली.
* पहिला भारतरत्न पुरस्कार-सी. राजगोपालाचारी, एस. राधाकृष्णन व सी. व्ही. रामन यांना मिळाला.
* २००९चे शांततेचे नोबेल पारितोषिक-बराक ओबामा.
* २००९चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक-व्यंकटरामन रामकृष्णन
* भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते-रवींद्रनाथ टागोर (१९१३-साहित्य)
* २००९चा साहित्य अकादमीचा पुरस्कार-हिंदी कवी कैलास वाजपेयी यांच्या 'हवा में हस्ताक्षर'ला देऊन गौरविण्यात आले.
* २००९ची मिस वर्ल्ड-कायनी अल्दोरिनो (जिब्राल्टर)
* २००८चा दादासाहेब फाळके पुरस्कार-सिनेमॅटोग्राफर बी. के. मूर्ती यांना देऊन गौरविण्यात आले.
* २००९ चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार-अभिनेत्री सुलोचना.
* २००९ चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार- प्रणव मुखर्जी
* २००९चा जनस्थान पुरस्कार (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)- ना. धों. महानोर
* २००९चा महात्मा गांधी शांतता पुरस्कार- म्यानमारच्या ऑग सान स्यू की यांना मिळाला.
* सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाकडून 'डी. लिट' पदवी देऊन गौरविण्यात आले.
* परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एसीएम फेलो पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली.
२) निवड, नेमणूकाविषयक घडामोडी :
* १५व्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार व मंत्री : अगाथा संगमा
* नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी शिवशंकर मेनन यांची नेमणूक
* भारताचे नवे २६वे लष्करप्रमुख म्हणून व्ही. के. सिंग ३१ मे २०१० पासून सूत्रे हाती घेतील.
नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या :
पश्चिम बंगाल - एम. के. नारायणन
राजस्थान - प्रभा राव
केरळ - रा. सू. गवई
पंजाब - शिवराज पाटील
छत्तीसगड - शेखर दत्त
महाराष्ट्र - के. शंकरनारायणन
* भारतीय हवाई दलाचे प्रमुख-प्रदीप वसंत नाईक (२२वे) एअरचीफ मार्शल
* जागतिक आरोग्य संघटनेचे उपसंचालक-डॉ. रघुनाथ माशेलकर
* भारताचे मालदीव येथील राजदूत-ज्ञानेश्वर मुळे
* भारताचे नौदल प्रमुख-अॅडमिरल निर्मलकुमार वर्मा (१७वे)
* राष्ट्रीय भटक्या-विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष-बाळकृष्ण रेणके
* विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष-डॉ. सुखदेव थोरात
* इस्रोचे नवीन अध्यक्ष-डॉ. के. राधाकृष्णन
* राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष-डॉ. वसंत गोवारीकर
* युनोचे महासंचालक-वान की मून (दक्षिण कोरिया)
* अमेरिकेतील भारताच्या नव्या राजदूत-मीरा शंकर
* महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त-नीला सत्यनारायण
* अफगाणिस्तानचे अध्यक्ष-हमीद करझई
* चीनचे अध्यक्ष-हू जिंताओ, पंतप्रधान-वेन जियाबाओ
* नेपाळचे अध्यक्ष-डॉ. रामबरन यादव, पंतप्रधान-माधवकुमार नेपाळ
* रशियाचे अध्यक्ष-दिमित्री मेदवेदेव, पंतप्रधान-ब्लादिमीर पुतीन
* आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे महासंचालक-युकिया अमानो (जपान)
* नामचे महासचिव-होस्नी मुबारक
* राष्ट्रकूलचे महासचिव-कमलेश शर्मा
* जागतिक बँकेचे अध्यक्ष-रॉबर्ट झोएलिक
* सार्कचे अध्यक्ष-महिंद्रा राजपक्षे (श्रीलंका)
३) बहुचर्चित पुस्तके :
* रिटर्न टू अल्मोडा-आर. के. पचौरी
* द ग्रेट इंडियन नॉवेल-शशी थरूर
* द व्हाईट टायगर-अरविंद अडिगा
* द ओल्ड प्ले हाऊस-कमलादास सुरैय्या
* ड्रीम्स ऑफ माय फादर (आत्मचरित्र)-बराक ओबामा
* मधुशाला-हरिवंशराय बच्चन
* गॉन विथ द विंड-मार्गारेट मिचेल
* सुपरस्टार इंडिया-शोभा डे
* द कोर्स ऑफ माय लाईफ-सी. डी. देशमुख
* संतसूर्य तुकाराम-डॉ. आनंद यादव
* ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक-बी. जी. देशमुख
* स्पीकर्स डायरी-मनोहर जोशी
* माय प्रेसिडेन्शियल इयर्स-डॉ. व्यंकटरामण
* डेबू-विठ्ठल वाघ
* द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, फाईव्ह पॉईंट समवन-चेतन भगत
* यूअर्स सिंसयर्ली टुडे-नटवर सिंह
* तहान, बारोमास-सदानंद देशमुख
४) विविध महत्त्वाच्या समित्या व आयोग :
* राम प्रधान समिती - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती
* किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती
* अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली.
* डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती
* माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता
* डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता
* न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी
* रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे
* शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी
* इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी
* अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता
* कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता
* डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता
* आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता
* न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता
* न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग - सहाव्या केंद्रीत वेतन आयोगाकरिता
* यशपाल समिती - देशातील उच्च शिक्षण धोरणात आमूलाग्र सुधारणा सुचविणे
* मुखोपाध्याय समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले
५) विविध ऑपरेशन्स
* ऑपरेशन क्लीअर - आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम
* ऑपरेशन चमर्स - काश्मीरमध्ये लपलेल्या अतिरेक्यांविरुद्ध भारतीय सेनेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन रेडडॉन - सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन पुशबॅक - भारतातील बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात राबविलेली मोहीम
* ऑपरेशन ब्लॅकबोर्ड - प्राथमिक शिक्षण स्तरावर किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम
* ऑपरेशन मेघदूत - भारतीय सेनेने सियाचीन खोऱ्यात राबविलेली मोहीम
* ऑपरेशन ब्लू स्टार - भारतीय सेनेने सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेकीविरोधी मोहीम
* ऑपरेशन विजय - कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राबवलेली मोहीम (२६ मे ते २६ जुलै १९९९)
* ऑपरेशन सनशाईन - कोलकात्यातील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे व विक्रेत्यांविरुद्ध राबवलेली मोहीम
* ऑपरेशन साहाय्यता - महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये भूकंपग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी
* ऑपरेशन कालभैरव - मादक द्रव्याचा व्यापार बंद करण्यास भारताने राबवलेली मोहीम
६) विविध आंतरराष्ट्रीय करार व संमेलने :
* डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केली होती.
* नोव्हेंबर २००९ मध्ये भारत व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला.
* २७ ऑक्टो. २००९ रोजी भारत व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला.
* अर्जेटिना हा सातवा देश आहे की भारताने आंतरिक्ष सहकार्य करार केला.
* भारत सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत 'डॉल्फिन' या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले.
* ४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते.
* पुणे येथे होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड
* ऑक्टोबर २०१० मध्ये जगातील पहिल्या व्याघ्र शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार असून ही परिषद राजस्थानातील रणथंबोर येथे पार पडणार आहे.
* पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, 'विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.'
General Information :- समाजसुधारक
थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश) ० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर ० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे) ० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर) ० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी) ० महात्मा फुले- पुणे ० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी) ० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा) ० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक) ० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक) ० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी) ० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड) ० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड) ०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक) ० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा) ० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य) ० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी) ० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा) ० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती) ० साने गुरुजी- पालघर (रायगड) ० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती) ० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर) ० संत ज्ञानेश्वर- आपेगाव ०संत एकनाथ- पैठण- ० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना) ० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)
थोर समाजसुधारक व त्यांचे टोपणनांव
व्यक्ती टोपणनांव
बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य
भीमराव रामजी आंबेडकर - बाबासाहेब
गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
महादेव गोविंद रानडे - न्यायमूर्ती
गोपाळ गणेश आगरकर - सुधारक
धोंडो केशव कर्वे - महर्षी
शाहू महाराज - राजर्षी
विनोबा भावे - आचार्य
सयाजीराव गायकवाड - महाराजा
ज्योतिबा गोविंद फुल - महात्मा
गोपाळ कृष्ण गोखले - नामदार
गणेश वासुदेव जोशी - सार्वजनिक काका
रमाबाई - पंडिता
डेबुजी झिंगराजी जाणोरकर - संत गाडगेबाबा
दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी, रावबहादूर
विनायक दामोदर सावरकर - स्वातंत्र्यवीर
केशव सीताराम ठाकरे - प्रबोधनकार
रामचंद्र विट्ठल लाड - डॉ. भाऊ दाजी लाड
माणिक बंडुजी ठाकूर - तुकडोजी महाराज
नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व
पांडुरंग सदाशिव साने - साने गुरुजी
समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बहिष्कृत हितकारणी सभा,
पीपल्स एज्युकेशन सोसायटी शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन,
रिपब्लिकन पार्टी,
भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस
डॉ. आत्माराम पांडुरंग
प्रार्थना समाज
महात्मा फुले
सत्यशोधक समाज
गोपाळ कृष्ण गोखल
भारत सेवक समाज
नाना शंकरशेठ
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी,
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट
दादोबा पांडुरंग
परमहंस सभा,
मानवधर्म सभा (सुरत)
डॉ. भाऊ दाजी लाड
बॉम्बे असोसिएशन
महर्षी कर्वे
हिंगणे स्त्री शिक्षण संस्था,
महिला विद्यापीठ,
विधवा विवाहोत्तेजक मंडळ, समता मंच,
अनाथ बालिकाश्रम मंडळी,
निष्काम कर्ममठ
कर्मवीर भाऊराव पाटील
रयत शिक्षण संस्था,
दुधगांव विद्यार्थी आश्रम
ग. वा. जोशी
सार्वजनिक सभा (पुणे)
स्वा. सावरकर
मित्रमेळा,
अभिनव भारत.
विठ्ठल रामजी शिंदे
राष्ट्रीय मराठा संघ,
डिप्रेस्ठ क्लास मिशन
न्या. रानडे
सामाजिक परिषद,
डेक्कन सभा
पंडिता रमाबाई
शारदा सदन,
मुक्ती सदन,
आर्य महिला समाज
रमाबाई रानडे
सेवासदन (पुणे व मुंबई)
सरस्वतीबाई जोशी
स्त्री विचारवंती संस्था (पुणे)
डॉ. पंजाबराव देशमुख
श्री. शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती),
श्रद्धानंद छात्रालय,
भारत कृषक समाज
संत गाडगेबाबा
पंढरपूर, नाशिक, देहू, मुंबई येथे धर्मशाळा,
गौरक्षण संस्था
(मूर्तिजापूर) पूर्णा नदीवर श्रमदानातून स्वत: घाट बांधला
(श्री क्षेत्र ऋणमोचन),
अंध-पंगू सदावर्त ट्रस्ट (नाशिक)
बाबा आमटे
आनंदवन (चंद्रपूर) अशोकवन (नागपूर)
डॉ. बाबा आढाव
हमाल भवन
हमीद दलवाई
मुस्लिम सत्यशोधक समाज
डॉ. केशव हेडगेवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
थोर समाजसुधारक व त्यांचे साहित्य ग्रंथ, आत्मचरित्र
गोपाळ गणेश आगरकर
डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस, विकार विलसित
लोकमान्य टिळक
गीतारहस्य, ओरायन, दि आक्र्टिक होम इन द वेदाज्
न्या. रानडे
मराठी सत्तेचा उदय
सावित्रीबाई फुले
सुबोध रत्नाकर (काव्यसंग्रह)
गोपाळ कृष्ण गोखले
राजकारणाचे आध्यात्मिकीकरण
महात्मा फुले
तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब,
शिवाजी महाराजांचा पोवाडा,
गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड,
सार्वजनिक सत्यधर्म
डॉ. आंबेडकर
बुद्ध अॅड हिज धम्म, थॉटस् ऑन
पाकिस्तान, हू वेअर शुद्रास, कास्टस्
इन इंडिया, द अनटचेबल्स, रिडल्स
इन हिंदू इजम्
महर्षी वि. रा. शिंदे
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न,
अनटचेबल इंडिया, बहिष्कृत भारत
बाबा पद्मनजी
यमुना पर्यटन, अरुणोदय (आत्मचरित्र)
गोपाळ हरी देशमुख
शतपत्रे, हिंदुस्थानचा इतिहास
स्वा. सावरकर
माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्य
समर, काळे पाणी, जोसेफ मॅझिनीचे
चरित्र, कमला (अंदमानच्या तुरुंगात असताना)
साने गुरुजी - श्यामची आई (नाशिकच्या असताना लिहिले)
सेनापती बापट - दिव्यजीवन
ताराबाई शिंदे - स्त्री-पुरुष तुलना
समर्थ रामदास स्वामी दासबोध, मनाचे श्लोक
थोर समाजसुधारक व त्यांची वृत्तपत्रे, मासिके
न्या. रानडे - इंदूप्रकाश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मूकनायक (पाक्षिक)
लोकमान्य टिळक - केसरी व मराठा
विनोबा भावे - महाराष्ट्र धर्म (मासिक)
बाळशास्त्री जांभेकर - दर्पण (साप्ताहिक)
भाऊ महाजन - प्रभाकर (साप्ताहिक)
गोपाळ गणेश आगरकर - सुधारक
भाई माधवराव बागल - अखंड भारत
डॉ. पंजाबराव देशमुख - महाराष्ट्र केसरी
साने गुरुजी - साधना (साप्ताहिक)
गोपाळ हरि देशमुख - लोकहितवादी (मासिक)
गोपाळ कृष्ण गोखले - हितवाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - समता, जनता, बहिष्कृत भारत (पाक्षिक)
थोर महापुरुषांचा जन्म व मृत्यू दिवस
व्यक्ती जन्म दिवस मृत्यू दिवस
लोकमान्य टिळक - २३ जुलै, १८५६ १ ऑगस्ट, १९२०
स्वा. सावरकर - २८ मे, १८८३ २६ फेब्रुवारी, १९६६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - १४ एप्रिल, १८९१ ६ डिसेंबर, १९५६
राजर्षी शाहू महाराज - २६ जून, १८७४ ६ मे, १९२२
महर्षी कर्वे - १८ एप्रिल, १८५८ ९ नोव्हेंबर, १९६२
कर्मवीर भाऊराव पाटील - २२ सप्टेंबर, १८८७ ९ मे, १९५९
महात्मा फुले - ११ एप्रिल, १८२७ २८ नोव्हेंबर, १८९०
गोपाळ गणेश आगरकर - १४ जुलै, १८५६ १७ जून, १८९५
वासुदेव बळवंत फडके - ४ नोव्हेंबर, १८४५ १७ फेब्रुवारी, १८८३
(एडनच्या तुरुंगात)
Current Affairs :- Maharashtra
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात
घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर 'बावन्न दरवाजांचे शहर' म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची 'भाग्य लक्ष्मी' असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास 'प्रीतीसंगम' असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
* भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
* महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
* माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे 'राष्ट्रीय विधी विद्यापीठ' स्थापन होणार आहे.
* थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
* रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
* भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)
* महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते.
Wednesday, April 7, 2010
Current Affairs:History
ऐतिहासिक घटना |
* १६००- ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना.
* १६१०- मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांकडून आंदण मिळाले.
* १६३०, १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.
* १६६४- फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
* १६७४, १६ जून- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.
* १६८०, १३ एप्रिल- छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू.
* १७१३- पेशवाईचा उदय.
* १७५७, २३ जून- प्लासीची लढाई (बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा इंग्रजांकडून पराभव)
* १७५७- रॉबर्ट क्लाईव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला.
* १७७३- रेग्युलेटिंग अॅक्ट. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
* १७७४- वॉरन हेस्टिंग्ज भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला.
* १७७९- फ्रेंच राज्यक्रांतीस सुरुवात.
* १७९३- लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली.
* १८१८- पेशवाईचा अस्त/ मराठी सत्तेचा शेवट.
* १८२८, २० ऑगस्ट- ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली.
* १८२९- विल्यम बेंटिकने सतीबंदी प्रथा कायदा संमत.
* १८४८- भारतात स्वतंत्र तार व पोस्ट खाते सुरू (लॉर्ड डलहौसी)
* १८५२- नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांनी 'बॉम्बे असोसिएशनची' स्थापना केली.
* १८५३- मुंबई-ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू.
* १८५४- मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरू.
* १८५६- लोकमान्य बाळ गंघाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिखली येथे जन्म.
* १८५७- भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी प्रसिद्ध काळ, संग्रामाची पहिली सुरुवात 'मीरत' येथे झाली. मंगल पांडे या सैनिकाने काडतुसाचे कारण दाखवून प्रथमत: संग्रामास सुरुवात केली.
* १८५७- मुंबई, कोलकाता, चेन्नई विद्यापीठांची स्थापना.
* १८६१- इंडियन कॉन्सिल अॅक्ट पास. मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे हायकोर्टाची स्थापना, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म.
* १८६२- न्या. रानडे व डॉ. आर. जी. भांडारकर मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर.
* १८६७- प्रार्थना समाजाची स्थापना (न्या. रानडे, डॉ. भांडारकर व डॉ. आत्माराम पांडुरंग).
* १८६९, २ ऑक्टोबर- महात्मा गांधी यांचा पोरबंदर येथे जन्म.
* १८७५, ७ एप्रिल- मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना (स्वामी दयानंद सरस्वती).
* १८७६, २३ फेब्रुवारी- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा अमरावती जिल्ह्य़ातील शेणगाव येथे जन्म.
* १८७७- मुंबई शेअर बाजाराची स्थापना.
* १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट संमत.
* १८८१- लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली.
* १८८२- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला.
* १८८५, २८ डिसेंबर- मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए. ओ. ह्य़ुम यांनी केली.
* १८८९, १४ नोव्हेंबर- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अलाहाबाद येथे जन्म.
* १८९०- महात्मा फुले यांचा जन्म (पुणे).
* १८९१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (महू).
* १८९३- स्वामी विवेकानंदांनी 'शिकागो' येथील जागतिक धर्म परिषद गाजविली.
* १८९७- रामकृष्ण मिशनची स्थापना.
* १९००- स्वा. सावरकरांनी नाशिक येथे 'मित्रमेळा' संघटनेची स्थापना केली.
* १९०४- पहिला सहकारविषयक कायदा संमत झाला.
* १९०५, १६ ऑक्टो.- लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.
* १९०७- सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल व मवाळ गट वेगळे.
* १९०८- लोकमान्य टिळकांनी 'मंडालेच्या' तुरुंगात 'गीतारहस्य' ग्रंथ लिहिला.
* १९११- सम्राट पंचम जॉर्जची भारतास भेट.
- बंगालची फाळणी रद्द झाल्याची पंचम जॉर्जची घोषणा.
- भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला गेली.
* १९१४- पहिल्या महायुद्धास सुरुवात.
* १९१५- महात्मा गांधी आफ्रिकेतून परत.
* १९१७- गांधीजींचा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह.
* १९१९, १३ एप्रिल- अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड.
* १९२०, १ ऑगस्ट- लोकमान्य टिळकांचा मृत्यू, मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ दहन (समाधी).
* १९२४- सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला.
* १९२७- भारतातील पहिले रेडिओ प्रसारण केंद्र मुंबईत सुरू.
* १९३०- महात्मा गांधींची 'मिठाचा कायदा तोडण्यासाठी' साबरमती ते दांडी पदयात्रा.
* १९३२- महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक 'पुणे करार.'
* १९३५- भारत सरकारचा कायदा संमत, या कायद्यानुसार 'ब्रह्मदेश' भारतापासून वेगळा करण्यात आला.
* १९३६- फैजपूर येथील काँग्रेसचे ५० वे अधिवेशन, अध्यक्ष- पंडित नेहरू.
* १९३९, १ सप्टेंबर- दुसऱ्या महायुद्धास सुरुवात.
* १९४२- मुंबई येथे 'गवालिया टँक' येथे भारत छोडो चळवळीस सुरुवात.
* १९४४- नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली.
* १९४५, २४ ऑक्टोबर- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
* १९४५- वेव्हेल योजना अपयशी ठरली.
* १९४५, १८ ऑगस्ट- फार्मोसा बेटावर सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात.
* १९४६- कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री परिषद)ची भारतास भेट.
- २ सप्टेंबर, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी राष्ट्रीय सरकारची स्थापना.
* १९४७, २० फेब्रुवारी- भारतास स्वातंत्र्य दिले जाईल, अशी लॉर्ड अॅटलींची घोषणा.
१८ जुलै- ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या विधेयकास इंग्लंडच्या राजाची मान्यता मिळून कायद्यात रूपांतर.
१५ ऑगस्ट, रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले.
* १९४७, १६ ऑगस्ट- रॅडक्लीफ समितीनुसार भारत-पाक सीमा अस्तित्वात.
* १९४८, ३० जानेवारी- महात्मा गांधींचा नथुराम गोडसेकडून खून.
* १९४९, २६ नोव्हेंबर- भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
* १९५०, २६ जानेवारी- पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.
Current Affairs: (महत्वाच्या घटना : थोर महापुरुष, विचारवंत, क्रांतिकारक)
भारताचे राष्ट्रपिता - महात्मा गांधी
आधुनिक भारताचे जनक - राजा राम मोहन रॉय
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक - ए. ओ. ह्य़ूम
भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक
भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक - लॉर्ड रिपन
भारतीय राज्यघटनेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय हरितक्रांतीचे प्रणेते - डॉ. एम. एस. स्वामीनाथन
भारतीय उद्योगधंद्याचे जनक - सर जमशेदजी टाटा
आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक - दादासाहेब फाळके
भारतीय धवल क्रांतीचे जनक - डॉ. वर्गीस कुरीयन
परमसंगणकाचे जनक - डॉ. विजय भटकर
भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार - राजा रामण्णा
नवीन उदारमतवादी आर्थिक धोरणाचे शिल्पकार - डॉ. मनमोहन सिंग
भारताच्या 'चांद्रयान- १' या प्रकल्पाचे जनक - अण्णा दुराई.
मार्क्सवादी कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते - ज्योती बासू
भारतातील प्रमुख संस्था व त्यांचे संस्थापक
संस्था संस्थापक
भारत सेवक समाज - गोपाळ कृष्ण गोखले
बनारस हिंदु विद्यापीठ - मदन मोहन मालवीय
अभिनव भारत संघटना - वि. दा. सावरकर
मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज - सर सैय्यद अहमदखान
हरिजन सेवक संघ - महात्मा गांधी
होमरुल लीग - लोकमान्य टिळक व अॅनी बेझंट
मुस्लिम लीग - नवाब सलीमुल्लाखान
पीपल्स एज्युकेशन सोसायटी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आझाद हिंद सेना - रासबिहारी बोस
शांतिनिकेतन - रवींद्रनाथ टागोर
रयत शिक्षण संस्था - भाऊराव पाटील
रामकृष्ण मिशन - स्वामी विवेकानंद
फॉरवर्ड ब्लॉक - सुभाषचंद्र बोस
नवजवान भारत सभा - भगतसिंग
हमाल पंचायत - बाबा आढाव
आत्मीय सभा - राजा राममोहन रॉय
आर्य समाज - स्वामी दयानंद सरस्वती
शारदा सदन - पंडिता रमाबाई
समता संघ - महर्षि कर्वे
भारतातील प्रसिद्ध व्यक्तींचे टोपण नांव
व्यक्ती टोपण नाव
पंडित नेहरू - चाचा
महात्मा गांधी - बापू
डॉ. राजेंद्र प्रसाद - बाबू
वल्लभभाई पटेल - सरदार
सी. एफ. अँड्रय़ूज - दीनबंधू
नाना पाटील - क्रांतिसिंह
नरेंद्र दत्त - स्वामी विवेकानंद
लाला लजपतराय - पंजाब केसरी
रवींद्रनाथ टागोर - गुरुदेव
बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य
सी. राजगोपालाचारी - राजाजी
चित्तरंजन दास - देशबंधू
व्यक्ती टोपण नाव
शेख मुजीब- उर रहमान - वंगबंधू
दादाभाई नौरोजी - पितामह
अरविंद घोष - योगी
वि. दा. सावरकर - स्वातंत्र्यवीर
भाऊराव पाटील - कर्मवीर
जयप्रकाश नारायण - जे.पी.
विनोबा भावे - आचार्य
सर फिरोजशहा मेहता - मुंबईचा सिंह
खान अब्दुल गफारखान - सरहद्द गांधी
सुभाषचंद्र बोस - नेताजी
वल्लभभाई पटेल - भारताचे बिस्मार्क
सरोजिनी नायडू - भारताची गानकोकिळा
भारतातील थोर व्यक्तींचे नारे
पंडित नेहरू - आराम हराम है
महात्मा गांधी - करा किंवा मरा, भारत छोडो, चले जाव
लोकमान्य टिळक - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच
लालबहादूर शास्त्री - जय जवान, जय किसान
सुभाषचंद्र बोस - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, जयहिंद
भगतसिंह - इन्कलाब झिंदाबाद
इंदिरा गांधी - गरिबी हटाओ
राजीव गांधी - मेरा भारत महान
रवींद्रनाथ टागोर - जन-गण-मन अधिनायक जय हे
बंकीमचंद्र चॅटर्जी - वंदे मातरम्
महंमद इक्बाल - सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा
रामप्रसाद बिस्मिल - सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
भारतातील थोर व्यक्तींचे गुरू
महात्मा गांधी - गोपालकृष्ण गोखले
गोपालकृष्ण गोखले - न्या. महादेव गोविंद रानडे
न्या. रानडे - न्या. के. टी. तेलंग
सुभाषचंद्र बोस - सी. आर. दास
रवींद्रनाथ टागोर - बंकिमचंद्र चॅटर्जी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महात्मा फुले व गौतम बुद्ध