१) कृषीविषयक घडामोडी० भारतातील 'सव्र्हे ऑफ इंडिया' ही संस्था जमिनीची मोजणी करून आकडेवारी प्रसिद्ध करीत असते. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण ९२.७ टक्के जमिनीचे मापन करणे शक्य झाले आहे.
० भारतातील एकूण जमिनीचे आकारमान ३२.८७ कोटी हेक्टर आहे. यापैकी ३०.४४ कोटी हेक्टर जमिनीचे मापन करण्यात आले आहे.
० भारतातील उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ४७ टक्के जमीन लागवडीखाली आहे. प्रत्यक्ष लागवडीखालील असलेल्या जमिनीपैकी २० टक्के जमिनीवर दुबार पिके घेतली जातात.
० लागवडीखालील निव्वळ क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. तर दुबार पिके घेण्याबाबत महाराष्ट्राचा भारतात १८ वा क्रमांक लागतो.
० महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१ टक्के क्षेत्र वनक्षेत्र आहे. राज्यातील वनक्षेत्रापैकी ५६ टक्के क्षेत्र विदर्भात, पाच टक्के मराठवाडय़ात व ३९ टक्के क्षेत्र उर्वरित महाराष्ट्रात आहे.
० भारतीय संविधानाच्या कलम ५१ (९) (जी) प्रमाणे वने, नद्या, जलाशय व वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.
० २००१ च्या जनगणनेनुसार भारतातील ५२ टक्के जनता स्वयंपाकासाठी जळावू लाकडावर अवलंबून आहे.
० भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ५४ टक्के हे पिकाखाली क्षेत्र, आठ टक्के क्षेत्र दोन ते तीन वर्षांनी लागवडीखाली, १३ टक्के जमीन पडीक तर २२ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त आहे. एकूण लागवडीच्या ७६ टक्के क्षेत्र निव्वळ अन्नधान्य उत्पादनासाठी वापरले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पदनाच्या २६.५ टक्के उत्पादन कृषी साधनापासून मिळते म्हणून भारत कृषीप्रधान देश आहे.
० भारत देश हा १९७४ साली अन्नधान्य उत्पादनात स्पयंपूर्ण झाला तर १९७७ मध्ये प्रथम अन्नधान्य निर्यात केले.
० तांदूळ हे देशातील महत्त्वाचे पीक मानले जाते. तांदूळ उत्पादक देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एकूण उत्पादनापैकी २१.६ टक्के उत्पादन भारतात होते. भारतात तांदळाचे पंजाब, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू ही तीनच राज्ये उच्च उत्पादकता असलेली राज्ये ओळखली जातात.
० तांदळाच्या नवीन सुधारित प्रचलित जाती- अभिषेक, भूतनाथ, चंद्रमा, इंदिरा सोना, सम्राट.
० चुरमुरे, पोहे तयार करण्यासाठी तांदळाची जात- राधानगरी १८५-२
० 'सुवर्णा सबमर्जन्स-१' ही तांदळाची नवी जात पूरप्रतिबंधक असून मोठय़ा पुरातही टिकून राहणारी आहे. (फिलिपाईन्समधील मनिला येथील संशोधकांनी शोधून काढली.)
० महाराष्ट्र देशात साखर उद्योगात आघाडीवर असून देशाच्या एकूण उत्पादनापैकी ३६ ते ४० टक्के साखर उत्पादन होते. महाराष्ट्रात एकूण १९३ साखर कारखाने आहेत.
२) फलोत्पादन : नारळ हे उष्ण कटिबंधीय पीक आहे. नारळाच्या जागतिक उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक इंडोनेशिया, दुसरा क्रमांक फिलिपाइन्स व तिसरा- भारत.
० महाराष्ट्रात ३२,००० हेक्टर (२००९) क्षेत्र नारळाखाली आहे.
० भारताची सरासरी प्रतिहेक्टर नारळ उत्पादन क्षमता ६६३२ आहे.
० नारळाच्या जाती- ऑरेंज डॉर्फ, ग्रीन डॉर्फ, यलो डॉर्फ, बाणवली (उंच जात)
० २ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो.
० चिंच- महत्त्वाची जात- प्रतिष्ठान (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
० आंब्याच्या महत्त्वाच्या जाती- हापूस, रत्ना, मल्लीका, आम्रपाली, सिंधू इ.
० केळीच्या जाती- बसराई, हरिसाल, सालवेलची, सफेद वेलची, राजेडी इ.
० मोसंबीच्या प्रचलित जाती- न्यूसेलर, मालगुडी, जाफा, वॉशिंग्टन नॉवेल, सातगुडी इ.
० डाळिंबाच्या जाती- गणेश (डीबीजी-१), मस्कत, डोलका, काबूल, आळंदी इ.
० चिक्कूच्या महत्त्वाच्या जाती- क्रिकेट बॉल, कोईमतूर-१, पिल्ली पत्ती, बंगलोर इ.
० द्राक्ष- माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन सिडलेस, शरद सिडलेस, किसमिस बेरी इ.
० नाशिक जिल्ह्य़ात पिंपळगाव बसवंत व पुणे जिल्ह्य़ात नारायणगाव येथे श्ॉम्पेन तयार करतात.
० पेरू- सरदार, धारवाड, बनारसी, कोथरूड, लखनऊ २९, नाशिक इ.
० अंजिर- पूना अंजीर, काबूल, लखनौ, मार्सिलीस, ब्राऊन
तुर्की इ.
० महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविण्यात अहमदनगर जिल्ह्य़ाचा प्रथम क्रमांक लागतो.
० अननसाचे उगमस्थान- ब्राझील
० काजूचे उगमस्थान- ब्राझील.
० मिरचीची विदर्भातील प्रसिद्ध जात- पांढुर्णा.
० संपूर्ण भारतात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश (६० टक्के) मध्ये होते.
० चिक्कू झाडाचे मूळस्थान- मेक्सिको
० आंब्याचे मूळस्थान- वायव्य आशिया
० डाळिंबाचे मूळस्थान- इराण
० अंजीराचे मूळस्थान- दक्षिण अरेबिया
० काजूचे मूळस्थान- ब्राझील
० फळांचे अभ्यास करणारे शास्त्र- पोमोलॉजी